महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपर्क कार्यालयाचे शुभारंभ करण्यात आला

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याच्या उद्धेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा गडचिरोली तर्फे जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ शनिवार दिनांक १४/०६/२०२५ ला दुपारी १२:०० वाजता करण्यात आला.तसेच पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला व राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिम्मित केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळेस गडचिरोली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र साळवे, जिल्हा सचिव डॉ राजेंद्र गडपल्लीवर, मनविसे अध्यक्ष स्वप्नील वाढई, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष इंजि.अंकुश संतोषवार,वाहतूक जिल्हा संघटक विकेश भुरसे,सचिन येणप्रेडडीवार,गोपाल बावणे,मनिष बावणे,शुभम कमलापूरवार,आशिष खडसे,आकाश कुळमेथे,गोलू गटलेवार व महाराष्ट्र नवनिर्माण सेना गडचिरोली चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.